Please wait...

date_range
वर्ष
collections_bookmark
अंक
local_library
वाचक
edit
लेखक

‘डिजिटल’ आवृत्तीच्या निमित्ताने...

      राहुरीस्थित महात्मा फुले कृषी विद्यापीठात प्रदीर्घ काळ अध्यापन; यासह काही कालावधी करिता कुलसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार अशा दुहेरी जबाबदारीतून सेवापूर्तीनंतर मुक्त झाल्यावर, मा. डॉ. बी. बी. तथा श्री. अण्णासाहेब पवार यांनी अकरा वर्षांपूर्वी ‘पूर्वा कृषिदूत’ हे मासिक सुरू केले. ते आता तपपूर्तीकडे वाटचाल करीत आहे. प्राध्यापक- संशोधक म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्यानंतर आता प्रत्यक्ष शेतकर्‍यांशी नियमित हितगुज करता यावे, असा त्यांचा यामागील हेतू होता, तो उत्तम प्रकारे साध्य होताना दिसत आहे. या क्षेत्रातील नवे प्रयोग, संशोधन भूमिपुत्रांपर्यंत पोहोचवावे, त्यांनी सृष्टि केंद्री -पर्यावरणस्नेही कृषि तंत्राचा अंगीकार करून निरोगी व भरघोस पीक घ्यावे, देशी गोवंश संवर्धनाच्या दृष्टीने जागृती होऊन दुग्धव्यवसाय सर्वार्थाने सकस व्हावा अशी देखील या उपक्रमामागची भूमिका होती. या समग्र चिंतन-प्रबोधनाला प्रारंभापासूनच जाणकारांची प्रशंसा लाभते आहे. व्यापक कृषिहिताच्या दृष्टीने ही बाब अत्यंत दिलासादायक म्हटली पाहिजे. आता या माध्यमातून सर्वतोपरी उपयुक्त अशा मधमाशी पालन व्यवसायाच्या प्रगतीसाठीही कृतिशील व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले आहे. ‘डिजिटल’ स्वरूपातील या आवृत्तीमध्ये प्राधान्याने याच विषयावरील लेख आहेत.

      कृषिशास्त्रज्ञ तसेच बहुश्रुत लेखक आणि वक्ते मा. डॉ. श्री. भास्कर गायकवाड या मासिकाचे संपादक या नात्याने अनेक कल्पक उपक्रम राबवीत असतात, हे आमच्या असंख्य वाचकांना माहिती आहेच. मूलतः ‘कृषिकुला’ची सर्जक पार्श्वभूमी, तिला लाभलेली विज्ञाननिष्ठ अशा उच्च शिक्षणाची जोड आणि नव्या जुन्याचा समन्वय साधणारा स्वागतशील दृष्टिकोन हे त्यांचे शक्तिस्थान आहे. बाभळेश्वरच्या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख या नात्याने कार्यरत असतानाची त्यांची कारकीर्द विशेष लक्षणीय ठरली होती. त्यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या प्रात् यक्षिकाधारित उपक्रमांची सर्व स्तरांवर प्रशंसा झाली. या कालावधीत केंद्राला दोन वेळा राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार; तर दोन वेळा विभागीय पुरस्कार लाभले. सन १९९५ मध्ये त्यांचे ‘सेंद्रिय शेती’वरचे पहिले मराठी पुस्तक प्रकाशित झाले. कृषि-उत्पादन प्रक्रियेत, आज एकूणच जगभरात विचारवंतांच्या केंद्रस्थानी असलेली जैव-संसाधनांची ही मराठी भाषेतील एक प्रकारची शुभारंभाची मांडणी म्हटली पाहिजे! तेव्हा अल्पावधीतच या पुस्तकाच्या तब्बल ५०,००० प्रती विकल्या गेल्या होत्या. ‘मायमराठी’च्या तत्कालीन शेती-प्रकाशन विश्वातील हा एक विक्रम मानला जातो. शेवगा लागवडीकरिता शेतकर्‍यांना प्रवृत्त करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नही लक्षणीय आहेत. केवळ ‘बांधावरचे पीक’ समजला जाणारा शेवगा त्यांनी ‘शेता’त आणून या पिकाला त्याचे योग्य ते स्थान मिळवून दिले. (या विषयावरील त्यांची पुस्तिकाही ‘पूर्वा’च्या माध्यमातून प्रकाशित झाली आहे.)

      ‘पूर्वा केमटेक’चे कार्यकारी संचालक मा.श्री. संजय पवार यांचे सक्रिय अर्थसाहाय्य या माध्यम-प्रपंचाला लाभत आहे. त्यामुळे शेती आणि शेतीपूरक क्षेत्रातील लिखित मार्गदर्शनाला उद्यमशील दृष्टिकोनाचा आवश्यक असा आयाम मिळतो आहे. या पहिल्या ‘डिजिटल’ आवृत्तीचे वाचक नक्कीच स्वागत करतील, याचा विश्वास वाटतो.

‘पूर्वा’ परिवार
संस्थापक संपादक

Avatar

संपादक

Avatar

सक्रीय मार्गदर्शन

Avatar

पारिवारिक परिचय

  • श्री. पराग वाड
    संपादन सहयोग
  • श्री. कैलास भामरे
    चित्रांकन आणि मांडणी
  • श्री. विजय सैंदाणे
    ग्राफिक आर्टिस्ट
  • श्री. निर्मल शिंदे
    श्री. अमोल अहिरे
    ई -आवृत्ती सहकार्य
  • श्री. राजेंद्र बागुल
    व्यवस्थापक - लेखा विभाग
  • श्री. विजय पवार
    संचालक , पूर्वा अॅग्रोटेक
  • श्री. सुहास कदम
    संचालक , पूर्वा अॅग्रो मार्केटिंग
  • श्री. महेश पाटील
    संचालक , पूर्वा केमटेक,
    खान्देश विभाग
  • श्री. विजय नाईकरे
    विभागीय व्यवस्थापक,
    पूर्वा केमटेक, पुणे विभाग
  • श्री. संजय पाटील
    विभागीय व्यवस्थापक,
    पूर्वा केमटेक, मराठवाडा विभाग
  • श्री. सचिन दिघे
    विभागीय व्यवस्थापक, पूर्वा केमटेक, संगमनेर विभाग
  • श्री. रईस इनामदार
    विभागीय व्यवस्थापक, पूर्वा केमटेक, कोपरगाव विभाग
  • श्री. नंदकिशोर चतरकर
    विभागीय व्यवस्थापक,
    पूर्वा केमटेक, विदर्भ विभाग

संपर्क

कृषीदूत

पूर्वा केमटेक प्रा.लि.
एम-११३, अंबड एम.आय.डी.सी. नाशिक ४२२०१०.
E-mail : poorvakrushidoot@gmail.com
Mobile No : 9921820969/ 7420014781

फेसबुक

Poorva Krushidoot